चाकण बाजारात कोथिंबीर, शेपू मातीमोल 

हरिदास कड
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले बाजार आवारात कोथिंबीर, शेपूचे भाव इतके गडगडले, की कोथिंबीर व शेपूच्या जुड्यांचे ढीग टाकून मिळेल तो कवडी भाव शेतकऱ्यांना घ्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. 

चाकण (पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले बाजार आवारात कोथिंबीर, शेपूचे भाव इतके गडगडले, की कोथिंबीर व शेपूच्या जुड्यांचे ढीग टाकून मिळेल तो कवडी भाव शेतकऱ्यांना घ्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. 

पावसामुळे शेतात कोथिंबीर व शेपू पीक मोठ्या प्रमाणात सडले आहे. माळरानावरील व जिरायती भागातील पिकांनी कसाबसा तग धरला आहे. चाकण बाजारात आज (ता. 31) शेतकरी कोथिंबीर व शेपू विकण्यासाठी आले होते. शेतकऱ्यांनी दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत जुड्या आणल्या होत्या. मात्र, बाजारात काहीच मागणी नव्हती. अगदी एक रुपयालाही जुडी गेली नाही. काहींनी कमी भावात शेतकऱ्यांकडून घेऊन त्या जुड्या किरकोळ विक्रीत दोन ते पाच रुपयाने विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

याबाबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, माजी सभापती चंद्रकांतदादा इंगवले यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable prices fell in Chakan market