आता घरपोच मिळणार भाजीपाला, किराणा आणि दूध; प्रशासनानेच घेतला पुढाकार!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 March 2020

माल विक्री करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.

मंचर : "शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला, तरकारी, किराणा माल व दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. संबधित व्यापाऱ्यांनी टेम्पोतून थेट सहकारी गृह प्रकल्पांच्या आवारात जाऊन माल द्यावा. तसेच मोबाईलद्वारे मागणी केल्यानंतर घरपोच माल पोचविण्याची व्यवस्था व्यापारी वर्गाकडून केली जाणार आहे," अशी माहिती आंबेगाव जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार डूडी व तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घोडेगाव रस्त्यावर असलेला संध्याकाळी व सकाळी दररोज भरणारा भाजीपाला बाजार गेल्या चार दिवसापासून बंद आहे. किराणा मालाच्या दुकानात व दुध विक्री केंद्रात हि गर्दी होत असल्याने दुध केंद्र हि बंद आहेत. या पार्श्व भूमीवर मंचर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने मंगळवार (ता.२४) पासून भाजीपाला तरकारी, किराणा माल, दुध व दुग्धजन्य पदार्थ आदी सर्व जीवनावश्यक माल इमारतींमध्ये पोचकरण्याचा निर्णय घेतलेला आहे.

- केंद्र सरकारची मोठी घोषणा; देशातंर्गत विमानसेवा करणार बंद!

नागरिकांनी भाजीपाला, किराणा व दुध टेम्पो इमारतीच्या आवारात आल्यानंतर अजिबात गर्दी करु नये. कुटुंबातील एका प्रतिनिधीने येऊन सदर मालाची खरेदी करावी. संबंधित व्यापाऱ्यांनी वाजवी दारातच विकावा. विनाकारण चढ्या भावात मालाची विक्री करू नये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आव्हान प्रशासनाने केले आहे.

- विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा : अजित पवार

"जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरविण्यास व्यापार्यांनी मान्यता दिली आहे," असे सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले. किराणा तरकारी माल, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या वाहनांना मंचर पोलिसांकडून रितसर परवानगी दिली जाईल. वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे फलक लावावेत. माल विक्री करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.

- Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; रूग्णाची संख्या...

संपर्क :

दुध व दुग्धजन्य पदार्थ : कात्रज डेअरी सुभाष थोरात- 8459501330, नारायण डोके- 9970199163 

किराणा माल : दिनेश खुडे- 9890288781, सोमनाथ खुडे- 9960000654, धर्मेंद्र मातोश्री- 9829216823

भाजीपाला तरकारी : रेणुका महिला बचत गट- 9960534725

- कोरोनाच्या जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables and milk delivery at home in lockdown situation