‘शाकाहार आरोग्यपूर्ण जीवनाचा आधार’ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे - ‘‘शाकाहार हा आरोग्यपूर्ण जीवनाचा आधार आहे. मानवाचा आहार हा आता धार्मिक मान्यतेचा विषय नसून, तो विज्ञाननिष्ठ आहे,’’ असे ‘सर्व जीव मंगल प्रतिष्ठान’चे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी गुरुवारी येथे सांगितले. 

पुणे - ‘‘शाकाहार हा आरोग्यपूर्ण जीवनाचा आधार आहे. मानवाचा आहार हा आता धार्मिक मान्यतेचा विषय नसून, तो विज्ञाननिष्ठ आहे,’’ असे ‘सर्व जीव मंगल प्रतिष्ठान’चे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी गुरुवारी येथे सांगितले. 

जगभरात येत्या शुक्रवारी (ता. २५) शाकाहार दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने बोलताना डॉ. गंगवाल म्हणाले, ‘‘शाकाहार का मांसाहार हा वाद शास्त्रीय विरुद्ध अशास्त्रीय दृष्टिकोन असा आहे. पर्यावरणविषयक जागरूकता विरुद्ध नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळपट्टीही त्यात आहे. सर्व प्राणिमात्रांविषयी दया व प्रेमभाव विरुद्ध अमानुष क्रौर्य यामधील हा वाद आहे. ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार ‘दुग्धजन्य शाकाहार’ याच्याइतका आरोग्यासाठी उत्तम असा आहार जगात दुसरा नाही.’’ 

योग्य पद्धतीने घेतलेल्या शाकाहाराचे पोषणमूल्य चांगले असते. त्यामुळेच क्रीडाक्षेत्रात विक्रमी कामगिरी करणारे अनेक खेळाडू पूर्णपणे शाकाहारी आहेत, असा विश्‍वास डॉ. गंगवाल यांनी व्यक्त केला. 

लेप्रो ओबेसो सेंटरच्या डॉ. पूनम शहा म्हणाल्या, ‘‘शाकाहार हा परिपूर्ण आहार आहे. पालेभाज्यांतून शरीराला आवश्‍यक ती पोषकद्रव्ये योग्य प्रमाणात मिळतात.’’

Web Title: Vegetarian healthy life support