जमिनीच्या वादातून वाहनांची मोडतोड

ब्राह्मणोली (मावळ) - टोळक्‍याने केलेली मोटारीची तोडफोड.
ब्राह्मणोली (मावळ) - टोळक्‍याने केलेली मोटारीची तोडफोड.

लोणावळा - पवना धरणाजवळील ब्राह्मणोली येथे जमिनीच्या वादातून १० ते १२ वाहनांची तोडफोड व महिलांना मारहाण करून दहशत माजविण्याचा प्रकार झाला. सोमवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अनिकेत कांताराम काळे (वय २१), हनुमंत रामू काळे (वय ४२), सागर शांताराम काळे (वय २२), बाबूराव शहाजी काळे (वय २८), अक्षय कांताराम काळे (वय २२, सर्व रा. ब्राह्मणोली, मावळ) यांच्यासह अज्ञात १६ जणांच्या विरोधात मारहाण व तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत वंदना काळे व रेश्‍मा संतोष मोहोळ या महिला जखमी झाल्या. गावात कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. 

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावकीतील जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. पवना धरण क्षेत्रालगत येथील शेतकरी शांताराम काळे यांची शेतजमीन आहे. त्यांची काही जमिनी धरणात गेली असून, उर्वरित क्षेत्रावर ते सध्या शेती करीत आहेत. त्यांच्या जमिनीलगत गावातील काहींनी सध्या कॅम्प साइड तयार केली असून, तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यातून वाद निर्माण झाला होता. त्याचा राग मनात धरून हनुमंत काळे, बाबूराव काळे, अनिकेत काळे, सागर काळे, अक्षय काळे यांच्यासह आलेल्या टोळक्‍याने काही घरांवर दगडफेक केली. या वेळी गावात कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यासाठी आलेल्या दहा ते बारा मोटारी व दुचाकींची या टोळक्‍याने मोडतोड केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वंदना काळे व रेश्‍मा मोहोळ या महिलांना जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वंदना काळे यांना पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर गावामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन रणबिरे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com