आरटीओ झाले वाहनांचे गोदाम

आरटीओ झाले वाहनांचे गोदाम

पुणे -  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हे सध्या कारवाई दरम्यान पकडलेल्या वाहनांचे गोदाम झाले आहे. या वाहनांनी ‘आरटीओ’चा परिसर पूर्ण भरला असून, येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे.

आरटीओकडून कारवाई करून पकडलेली वाहने कार्यालयाच्या आवारामध्येच उभी केली जातात. ठराविक काळानंतर या वाहनांचा लिलाव केला जातो. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून या वाहनांचा लिलाव करता आलेला नाही. त्यामुळे  कार्यालयाच्या आवारात सुमारे सहाशे वाहने उभी आहेत. यातील सुमारे अडीचशे वाहनांचा लिलाव आतापर्यंत होणे अपेक्षित होत. या वाहनांमुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या वाहनतळामध्येही वाहने लावण्यास जागा उरलेली नाही. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने पकडण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव करता येत नाही. त्यामुळे कार्यालय परिसरामध्ये वाहनांची संख्या वाढलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर वाहनांचा लिलाव करता येईल.
- विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com