‘त्या’ मुलांसाठी पोलिसांचे एक पाऊल

Police
Police

पुणे - गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांसमवेत राहणाऱ्या कौस्तुभलाही (नाव बदलले आहे) पोलिसांनी वाहनचोरीच्या प्रकरणात ताब्यात घेतले. ही बातमी कौस्तुभच्या शाळेत पोचली. अन्य विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये, म्हणून शाळेने पुढील वर्षी त्याला प्रवेश देण्यास नकार दिला. पालकांमार्फत ही बाब पुणे पोलिसांच्या ‘विशेष बाल पथका’ला समजल्यानंतर त्यांनी संबंधित शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांनाही कौस्तुभच्या चांगल्या वागणुकीची हमी देऊन मदतीचा हात दिला. याच पद्धतीने शहरातील अनेक विधीसंघर्षित बालकांचे प्रश्‍न समजून घेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

शहरात होणाऱ्या अनेक गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘विशेष बाल पथका’ने काम करण्यास सुरवात केली आहे. जामिनावर सुटलेल्या विधीसंघर्षित बालकांची पोलिस ठाण्यांच्या मार्फत बैठक घेतली जाते. त्यामध्ये विधीसंघर्षित बालक व त्यांच्या पालकांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या जातात. त्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लोकांचे समुपदेशन करून प्रश्‍न सोडविला जातो. बालकाकडून पुन्हा गुन्हा घडू नये, यादृष्टीने त्याचेही सामाजिक व स्वयंसेवी संस्थेच्या समुपदेशकामार्फत समुपदेशन केले जाते. या उपक्रमावर पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, फौजदार बाळासाहेब भोर यांचे पथक काम करीत आहे.

विधीसंघर्षित बालक व पालकांच्या अडचणी 
  पोलिसांचा ससेमिरा, मित्रमंडळी, नातेवाइकांकडून अवहेलना
  अपमानास्पद वागणूक, ‘करिअर’ खराब होण्याची भीती

विधीसंघर्षित बालक भविष्यात सराईत गुन्हेगार होऊ नयेत, म्हणून पोलिस आयुक्तांनी ‘विशेष बाल पथक’ तयार केले. त्याद्वारे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. समुपदेशनासाठी सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनीही आमच्याशी संपर्क साधला आहे. 
- मनीषा झेंडे, पोलिस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग

मुलाने सायकल चोरली. पोलिस चौकशीसाठी येत असल्याने रहिवासी नकारात्मक दृष्टीने पाहतात. ही बाब विशेष बाल पथकासमोर मांडली. पोलिस यायचे थांबले आणि समुपदेशनामुळे लोकांचा दृष्टिकोनही बदलला. 
- विधीसंघर्षित बालकाचे पालक

१५५० तीन वर्षांत जामिनावर सुटलेली बालके
३० ‘विधीग्रस्त मुक्त’च्या झालेल्या बैठका
१० ते १५ बैठकीस उपस्थित बालक/पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com