वडगाव बुद्रूक येथे हॉस्पिटलसह वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

वडगाव बुद्रूक येथे हॉस्पिटलसह अनेक वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हातात कोयते आणि रॉड घेऊन परिसरातील चौदा वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच एक दवाखाना देखील फोडण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

धायरी (पुणे) : वडगाव बुद्रूक येथे हॉस्पिटलसह अनेक वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हातात कोयते आणि रॉड घेऊन परिसरातील चौदा वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच एक दवाखाना देखील फोडण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना देखील घडल्या आहे. या घटनेमध्ये मारुती कंपनीच्या 2 स्विफ्ट, हुंदाई कंपनीची असेन्ट, सॅंन्ट्रो इत्यादी प्रकारच्या चौदा चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून ,पोलिसांच्या देखील दुचाकी फोडल्याची माहिती समोर आली आहे.
हा प्रकार वडगाव भाजी मंडई, शेवटचा बस स्टॉप, धबडी, भैरवनाथ मंदिर परिसरात रात्री 1च्या सुमारास घडला आहे.

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

यावेळी सिंहगड पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर एका अॅक्टिव्हासारख्या गाडीवर तीन इसम हे हातात कोयता आणि रॉड घेऊन जाताना दिसत आहे. परंतु, अद्याप आरोपी कोण आहे हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle vandalism at Wadgaon Budruk