वाहनांचे ‘स्‍टिअरिंग’ आता महिलांच्या हाती

पीतांबर लोहार
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पिंपरी - ‘चूल आणि मूल’ ही महिलांबाबतची संकल्पना कधीच काळाआड गेली आहे. अनेक महिला विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवित आहेत. त्यातीलच एक म्हणजे वाहनचालक. पुरुषांच्या बरोबरीने आता महिला वाहने चालवू लागल्या आहेत. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिल्या गेलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सचा (वाहन चालक परवाना) विचार केल्यास महिलांचे प्रमाण चक्क ४० टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे घर आणि नोकरी सांभाळण्याबरोबरच महिलांच्या हाती वाहनांचे  स्‍टिअरिंगही आल्याचे स्पष्ट दिसते आहे. 

रस्ता शहरातील असो वा ग्रामीण भागातील. कोणत्याही रस्त्यावर दुचाकी चालविणाऱ्या युवती आणि महिला हमखास दिसतात. त्यात आता चारचाकी वाहनचालक महिलांची संख्याही वाढू लागली आहे. काही वर्षांपूर्वी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ड्रायव्हिंग क्षेत्रातही महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर ‘मुलगा, मुलगी अठरा वर्षांचे झाले की आमच्याकडे लर्निंग लायसन काढण्यासाठी येतात,’ हे परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याचे शब्द खरोखरच वास्तव दर्शविणारे आहेत. पोलिस दलातसुद्धा वाहनचालक महिला पोलिस आहेत. केवळ नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलाच नव्हे तर, गृहिणीसुद्धा ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेत आहेत. सफाईदारपणे त्या वाहने चालवित आहेत. 

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील (आरटीओ) आकडेवारीचा विचार केल्यास गेल्या आठ महिन्यांत ६७ हजार ३५३ महिलांना ड्रायव्हिंग लायसन घेतले आहेत. त्यात महिलांची संख्या १६ हजार २९० आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओच्या कार्यकक्षेत खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ या तालुक्‍यांचा समावेश होतो. शहरासह ग्रामीण भागातील महिलांचाही ड्रायव्हिंग शिकण्याकडे कल वाढला असल्याचे आरटीओकडील आकडेवरून दिसते.

घरी पप्पांची कार होती. त्यांचे बघून बघून कार चालवायला शिकले. त्यांनीही प्रोत्साहन दिले. कॉलेजला असताना ड्रायव्हिंग स्कूलमधून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. आता न घाबरता गाडी चालवू शकते. सध्या मी गृहिणी आहे. मिस्टरांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. नातेवाइकांकडे किंवा टूरला जाताना मीच कार चालविते. 
- मनीषा पवार, गृहिणी

महापालिकेतर्फे २००२ मध्ये महिलांसाठी आयोजित वाहनचालक प्रशिक्षण उपक्रमातून कार चालवायला शिकले. ड्रायव्हिंग लायसन मिळाले. सुरवातीला घरातून विरोध झाला. परंतु, दोन महिन्यांत गाडी चालवायला शिकले. त्यानंतर एका वेळी सहा महिलांना प्रशिक्षण दिले. तेव्हापासून महिलांना प्रशिक्षण देण्याचे ठरविले.   
- निर्मला जगताप, प्रशिक्षिका

Web Title: Vehicle Woman Driving License