पिंपळे गुरवमध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड 

53741227_426492854559553_70.jpg
53741227_426492854559553_70.jpg

पिंपरी : पोलिसांना टीप दिल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. तसेच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही ओढून नेले. ही घटना पिंपळे गुरव परिसरात मंगळवारी (ता.५) रात्री घडली.

अश्विन चव्हाण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे इतर चार ते पाच साथीदार, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ललिता राजाभाऊ फुले (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आरोपी अश्विन हा आपल्या चार ते पाच साथीदारांसह लक्ष्मीनगर परिसरात आला. त्याने फिर्यादी ललिता यांना उद्देशून 'नवनाथ तू माझी ती पोलिसांना टीप देतोस काय? आता त्याचे काय परिणाम होतात ते दाखवतो,' असे म्हणत फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच दहशत निर्माण करण्यासाठी कोयता आणि लाकडी दांडक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तसेच ललिता यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com