esakal | रवींद्र बऱ्हाटेने वापरलेली वाहने, मोबाईल पोलिसांनी केली जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Barhate

रवींद्र बऱ्हाटेने वापरलेली वाहने, मोबाईल पोलिसांनी केली जप्त

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : अटक टाळण्यासाठी फरार झालेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे (Rti Activits Ravindra Barhate) याला आळंदीतील (Alandi) एका व्यक्तीने त्याच्या घरी आश्रय दिला होता. बऱ्हाटेला अटक झाल्यापासून तो फरार आहे. फरार असताना बऱ्हाटेने वापरलेली तीन वाहने आणि मोबाईल पोलिसांनी केली जप्त केला आहेत. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने बऱ्हाटेच्या पोलिस (Police) कोठडीत २० जुलैपर्यंत वाढ केली आहे. (Vehicles mobiles used Rti Activits Ravindra Barhate were seized police)

विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. सागर म्हस्के असे बऱ्हाटे याला आश्रय देणा-याचे नाव आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. फरार काळात बऱ्हाटेने वापरलेल्या दोन दुचाकी आणि एक चारचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यातील कार ही बऱ्हाटे याची पत्नी संगीता हिच्या नावावर आहे. तर एक दुचाकी या प्रकरणातील फिर्यादी यांचा विश्‍वासघात करून ताब्यात घेतलेली आहे. तसेच, तीन सीमकार्ड आणि एक फोन देखील पोलिसांनी त्याकडून हस्तगत केला आहे.

हेही वाचा: अजित पवारांनी विचारलं झाडाचं नाव; वन अधिकाऱ्यांची बोलती बंद

तसेच फेसबुकवर टाकलेल्या क्लीप बऱ्हाटे याने स्वतः तयार केल्या होत्या. त्या सर्व ठिकाणांची पोलिसांनी पंचनामा केला आहे, अशी माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. १६) न्यायालयास दिली. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी बऱ्हाटे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या बाबी नमूद आहेत.

हेही वाचा: पुणे: तेवीस गावांच्या डीपीचा वाद; शासनाच्या डावावर भाजपचा प्रतिडाव

म्हस्के याचा शोध घेण्यासाठी, या गुन्ह्यातील सह आरोपी विशाल ढेरे याच्याकडून या गुन्ह्यात सहभागी होण्यासाठी ब-हाटने किती मोबदला घेतला याचा तपास करण्यासाठी, अटक टाळण्यासाठी बऱ्हाटेला आणखी कोणी मदत केली? त्याला अन्न, वस्त्र, निवारा, पैसे, औषधे, वैद्यकीय उपचार, प्रवासाची साधणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आर्थिक मदत व साहाय्य कोणी व कशा प्रकार केले? ही मदत कोठून पुरविण्यात आली? याचा तपास करण्यासाठी बऱ्हाटेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी ॲड. चव्हाण यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख करीत आहेत.

loading image