

RTO Officer–Broker Collusion Alleged in Bogus Vehicle Fitness Approvals
sakal
-प्रसाद कानडे
पुणे : राज्यातील व्यावसायिक वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे (फिटनेस सर्टिफिकेट) नूतनीकरण राज्यातच संबंधित आरटीओ कार्यालयाकडूनच करून घेणे अपेक्षित आहे. मात्र, प्रवासी सुरक्षा धोक्यात आणत रस्त्यावर धावण्यास अयोग्य असलेली व कागदपत्रे अपुरी असलेली वाहने राज्याची वाट न धरता महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आसाम, अरुणाचल प्रदेश व नागालँडसारख्या दुर्गम राज्याचे फिटनेस सर्टिफिकेट काढत आहेत.