नदीपात्रामधील वाहने महापालिका हलविणार

नदीपात्रामधील वाहने महापालिका हलविणार

पुणे - नदीपात्रात उभी केलेली ६०० वाहने हलविण्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देऊन नदीपात्र रिकामे करण्याचा निर्णय महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त समन्वय समितीमध्ये बुधवारी झाला. तसेच शहरातील प्रमुख १६ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचेही ठरले. 

शहरातील वाहतुकीशी संबंधित प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही विभागांची बैठक झाली. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांचाही बैठकीत सहभाग होता. त्यात विमानतळ रस्ता, पुणे रेल्वे स्टेशन, नगर रस्ता, सातारा रस्ता, महात्मा फुले मंडई, कोंढवा, येरवडा, कोरेगाव पार्क, लष्कर, हडपसर, चतुःशृंगी, बाणेर रस्ता, स्वारगेट, कात्रज, सिंहगड रस्ता येथील अतिक्रमणे काढण्याचे ठरले. तसेच नदीपात्रात पोलिसांनी जप्त केलेली सुमारे ६०० वाहने ठेवण्यात आली आहेत. ही वाहने अन्यत्र हलविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासही महापालिकेने तयारी दर्शविली. 

शहरात सुमारे १५ वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडले आहेत. ते सुरू करणे, अनधिकृत बांधकामे काढणे, ग्रेडसेपरेटरमधील खड्डे बुजविणे, दुभाजक दुरुस्त करणे आदींबाबतही चर्चा होऊन त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय या वेळी झाला, अशी माहिती वाहतूक शाखेच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली. रस्त्यावरील सुमारे ६०० बेवारस वाहने महापालिकेने जप्त केली आहेत. ती स्क्रॅप करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com