पुणे-बंगळुुरु महामार्गावरील 'या' टोल नाक्यावरून वाहने टोल-फ्री

महेंद्र शिंदे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावरून सोमवारी सायंकाळी सात वाजल्यापासुन वाहने टोल फ्री सोडण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले. त्यानुसार उद्या मंगळवार (ता.13) सायंकाळी सात वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी या टोल वरून वाहने फ्री सोडण्यात येणार आहेत. 

खेड-शिवापूर (पुणे) : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावरून सोमवारी सायंकाळी सात वाजल्यापासुन वाहने टोल फ्री सोडण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले. त्यानुसार उद्या मंगळवार (ता.13) सायंकाळी सात वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी या टोल वरून वाहने फ्री सोडण्यात येणार आहेत. 

रस्त्यावर पाणी आल्याने गेल्या सहा दिवसांपासून पुणे-बंगळूर हा महामार्ग कोल्हापुरजवळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र सोमवारी सकाळपासून या रस्त्यावरून कोल्हापुरला जाणारी वाहतूक सुरु झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अडकून पडलेली वाहने कोल्हापुरकडे जाण्यास सुरुवात झाली. तसेच विविध ठिकाणाहून पुरग्रस्त भागात मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. हे लक्षात घेऊन या रस्त्यावरील टोलवरून सोमवारी सायंकाळी सात वाजल्यापासून वाहने टोल फ्री सोडण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस म्हणाले, "गेल्या अनेक दिवसांपासून पुणे-सातारा रस्त्यावर कोल्हापुरकडे जाणारी अनेक वाहने अडकून पडली होती. सोमवारी या रस्त्यावरील वाहतूक सुरु झाली. या वाहनांची अडचण होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी टोलवरून चोवीस तासासाठी वाहने टोल फ्री सोडण्याच्या सुचना टोल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मंगळवारी (ता.13) सायंकाळी सात वाजेपर्यंत वाहने टोल फ्री सोडण्यात येणार आहेत."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles toll free from Khed-Shivapur and Anewadi toll Plaza