Dhangar Reservation : वेल्ह्यात धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणीसाठी रास्ता रोको

सरकारने दोन महिन्याचा अवधी दिला असून, सरकार धनगर समाजाची फसवणूक सरकार करत आहे.
Agitation for Dhangar Reservation
Agitation for Dhangar Reservationsakal

वेल्हे, (पुणे) - यळकोट यळकोटचा जय घोष करत सरकारच्या विरोधात घोषणा देत. अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणीसाठी वेल्ह्यात सोमवार (ता.२५) रोजी धनगर समाजाने रास्तारोको आंदोलन केले.

वेल्हे पंचायत समिती येथे धनगर समाज एकत्र येवून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोर्चा पंचायत समिती मार्गे वेल्हे बाजारपेठ येथून मेंगाईदेवी चौकात आल्यानंतर या ठिकाणी अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मेंगाईदेवी चौकात काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान धनगर आरक्षण अंमलबजावणीचे निवेदन निवडणुक नायब तहसीलदार उत्तम बढे, व तीर्थरूप गोसावी यांना देण्यात आले. राज्य शासनाने गेल्या ७३ वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

सरकारने दोन महिन्याचा अवधी दिला असून समाजाची फसवणूक सरकार करत आहे. अशी भावना धनगर समाजाकडून व्यक्त करण्यात आली. अंमलबजावणी लवकरात लवकर करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा धनगर समाजाकडून इशारा सरकारला देण्यात आला आहे.

चौंडी येथे यशवंत सेनेचे पदाधिकारी १९ दिवसांपासून उपोषणास बसले आहे.त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.सरकार बरोबर मुंबई येथे बैठक झाली परंतू ती निष्फळ ठरली आहे. त्यामुळे धनगर समाज आंदोलनाच्या पवित्र्यातच आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाची अंमलबजावणी राज्य शासनाने त्यांच्या अधिकारात लवकरात करावी अशी मागणी वेल्हे तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

यावेळी यशवंत सेना अध्यक्ष शंकर ढेबे, ग्रामपंचायत सदस्य शंकर ढेबे, सरपंच नथूराम डोईफोडे, सरपंच बाळासाहेब मरगळे, माजी उपसरपंच मारूती मरगळे, तुकाराम कोकरे, तुकाराम डोईफोडे, राम डोईफोडे, लक्ष्मण डोईफोडे, बबन ढेबे, राम जानकर, तानाजी मरगळे, माजी उपसरपंच शंकर ढेबे, रामभाऊ कचरे, पांडुरंग कचरे, भरत डोईफोडे, शिवाजी मरगळे, पांडुरंग ढेबे, कोंडीबा ढेबे, संजय हिरवे, रामभाऊ काळे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com