Velhe Accident : शिरकोली येथे टेम्पो खाली चिरडून शेतकऱी ठार

घराचे बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या पिक अप टेम्पो उलटून झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
Accident
Accidentesakal
Summary

घराचे बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या पिक अप टेम्पो उलटून झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला.

वेल्हे, (पुणे) - पानशेत धरण खोऱ्यातील दुर्गम शिरकोली ( ता.वेल्हे ) येथे घराचे बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या पिक अप टेम्पो उलटून झालेल्या अपघातात कोंडीबा उर्फ भाऊ आबाजी ढेबे (वय ४५, रा.शिरकोली) याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. असल्याची माहिती शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ यांनी दिली.

ही घटना आज गुरुवारी (ता.३०) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. शिरकोली गावाच्या शेजारी असलेल्या कच्च्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सरपंच अमोल पडवळ तसेच पानशेत पोलिस चौकीचे पोलिस हवालदार पंकज मोघे व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

मयत कोंडीबा ढेबे हे घराचे बांधकाम करण्यासाठी पुण्यातुन बांधकाम साहित्य घेऊन पिक अप टेम्पोमुधून‌ चालले होते. कच्च्या रस्त्यावर टेम्पो अचानक पलटी झाला. त्यावेळी टेम्पो मध्ये बसलेले ढेबे हे टेम्पो खाली चिरडून जागीच मृत्यूमुखी पडले. मयत कोंडीबा ढेबे यांच्या अपघाताती निधनाने शिरकोली पानशेत परिसरावर शोककळा पसरली आहे. मयत ढेबे यांच्या मागे पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com