Velhe News : मढे घाट परिसरात (रॅपलिंग) करण्यास मज्जाव

आदेशाचा भंग केल्यास गुन्हा दाखल करणार:- उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आदेश पुढील साठ दिवसांसाठी लागू
raigad
raigadsakal

वेल्हे - वेल्हे तालुक्यातील केळद मढे घाट परिसरात वर्षा विहारासाठी अनेक पर्यटक गर्दी करत असतात याच दरम्यान या ठिकाणी धबधब्यावर साहसी खेळ( रॅपलिंग) करताना अनेक पर्यटक दिसून येत आहे हे धोक्याचे असल्याने या ठिकाणी असे साहसी खेळ करण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचा लेखी आदेश भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी काढला. असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर तसेच आयोजकांवर गुन्हा दाखल होणार आहे. हा आदेश पुढील साठ दिवसांसाठी लागू असणार असल्याची माहिती भोरचे उपविभागीय राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.

पुणे-रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर पावसामुळे निसर्ग सौंदर्य बहरले आहे. सततच्या पडत असलेल्या पावसामुळे जुन ते सप्टेंबर या कालावधीत वेल्हे तालुक्यातील अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते .

यामध्ये किल्ले राजगड, किल्ले तोरणा तसेच मढे घाट परिसरातील धबधबा प्रवाहीत होतात .या ठिकाणी शेकडो पर्यटक वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. यामध्ये कुटुंबासह लहान थोर महिला पर्यटकांचा समावेश असतो.

raigad
Kokan Rain Update : खेडमध्ये मुसळधार; दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प, जगबुडी, नारिंगी पात्राबाहेर

मात्र या ठिकाणी पर्यटक फिरण्यासाठी आल्यानंतर धबधब्यामध्ये साहसीखेळ करणाऱ्या काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्यावरील भागातून खाली दरीमध्ये २००ते ५०० फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असून यामध्ये मोठ्या स्वरुपाची दुर्घटना होऊन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

raigad
Kokan Refinery Project : 'सुंदर कोकण समृद्ध कोकण' बारसू रिफायनरीविरोधात ठिय्या आंदोलन

त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत अशा खेळांना मज्जाव करत बंदी घालण्यात आल्याचे आदेश काढले असून सदर आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था सहभागी पर्यटक यांच्यावर

भारतीय दंड संहिता1908 चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन 144(2) अधिकाराचा वापर करत उपविभागीय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात येणार आहे. असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com