उपराष्ट्रपती नायडू आज बारामतीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

बारामती - उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (ता. २२) बारामतीत येत आहेत. या वेळी ते विविध प्रकल्पांची माहिती घेणार असून, नेदरलॅंडमध्ये शिक्षण घेणाऱ्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत.  

बारामती - उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (ता. २२) बारामतीत येत आहेत. या वेळी ते विविध प्रकल्पांची माहिती घेणार असून, नेदरलॅंडमध्ये शिक्षण घेणाऱ्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत.  

शुक्रवारी सकाळी ते कृषी विज्ञान केंद्रास भेट देणार आहेत. त्यांच्या भेटीसंदर्भात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी माहिती दिली. शारदानगर येथील इंडो डच प्रकल्पांतर्गत उभारलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राची पाहणी करणार आहेत. त्या ठिकाणचे टोमॅटो, रंगीत ढोबळीची तसेच माती विनाशेतीच्या प्रकल्पाची पाहणी करतील. त्यानंतर ११० एकरांवरील विविध प्रात्यक्षिकांचीही ते पाहणी करणार असून, माती पाणी परीक्षण, जैविक खतशाळा व टपाल खात्यामार्फत सुरू असलेल्या माती परीक्षणाच्या उपक्रमाची माहिती घेणार आहेत. यानंतर ते कृषी विज्ञान केंद्राच्या मुख्य कार्यालयातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कृषी महाविद्यालयास मंजूर झालेल्या राज्यातील पहिल्या अटल इनक्‍युबेशन सेंटर तसेच अटल टिंकरिंग लॅबची माहिती घेणार आहेत. यानंतर ते विद्या प्रतिष्ठानमधील म्युझियम व तेथील माहिती घेऊन पुण्यास रवाना होतील. उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी बारामतीत चोख बंदोबस्त आहे. हा खासगी दौरा असल्याचे कारण देत प्रशासनाने या दौऱ्यामध्ये वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांनाही प्रवेश नाकारला आहे.

Web Title: Venkaiah-Naidu in baramati