शरद पवार यांच्या जनवस्तूसंग्रहालयाला वेंकय्या नायडू यांची भेट

मिलिंद संगई
शुक्रवार, 22 जून 2018

शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा जवळपास पन्नास वर्षांचा इतिहास छायाचित्रांसह विविध वस्तूंच्या माध्यमातून या जनसंग्रहालयात जिवंत करण्यात आला आहे.

बारामती शहर - 'एका असामान्य माणसाच्या व्यक्तिचित्रणाचे प्रतिबिंब दर्शविणारे संग्रहालय'... अशा शब्दात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी विद्या प्रतिष्ठानमधील शरद पवार यांच्या जनवस्तूसंग्रहालयाचे वर्णन केले. 
आज बारामती भेटी दरम्यान नायडू यांनी या वस्तूसंग्रहालयास भेट देत पाहणी केली.

शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा जवळपास पन्नास वर्षांचा इतिहास छायाचित्रांसह विविध वस्तूंच्या माध्यमातून या जनसंग्रहालयात जिवंत करण्यात आला आहे. हे संग्रहालय पाहून नायडू भारावून गेले. अनेक छायाचित्रे व अनेक वस्तूंचे त्यांनी बारकाईने निरिक्षण करत कौतुकही केले. 
ज्या पध्दतीने हे संग्रहालय व्यवस्थित ठेवण्यात आले होते तो उगवत्या पिढीसाठी एक वारसा असल्याचाही अभिप्राय नायडू यांनी लिहून ठेवला. 
खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी उपराष्ट्रपतींना या संग्रहालयाबाबत माहिती दिली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Venkaiah Naidu meets Sharad Pawars public gallery