कर्जमाफी कायमस्वरुपी उत्तर नाही: व्यंकय्या नायडू

अनिल सावळे
गुरुवार, 21 जून 2018

शेतकऱ्यांनी पुन्हा पोल्ट्री, दूध उत्पादन आणि मत्स्य व्यवसायाकडे वळावे. तरूण शेती व्यवसायापासून दूर जात आहे ही चिंतेची बाब आहे. मोफत वीज देण्याऐवजी पूर्णवेळ वीज द्या. 

पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळे तात्पुरता दिलासा मिळेल. पण कर्जमाफी हे कायमस्वरूपी उत्तर नाही. शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, वेळेवर कर्ज, पीकविमा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

शाश्वत आणि किफायतशीर शेती या विषयावर वैंकुठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, डॉ. एम. एस. स्वामीनाथन आदी उपस्थित होते.

नायडू म्हणाले, की शेतकऱ्यांनी पुन्हा पोल्ट्री, दूध उत्पादन आणि मत्स्य व्यवसायाकडे वळावे. तरूण शेती व्यवसायापासून दूर जात आहे ही चिंतेची बाब आहे. मोफत वीज देण्याऐवजी पूर्णवेळ वीज द्या. शाश्वत आणि किफायतशीर शेतीसाठी सिंचन व्यवस्था, माती परीक्षण, हवामानाचा अचूक अंदाज, धान्य साठवणुकीसाठी गोदामे, ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते अशा पुरेशा सुविधा देण्याची गरज आहे.

Web Title: venkaiah naidu talked about farmers in Pune