Pradeep Kurulkar : कुरुलकरच्या जामीन अर्जावर १६ ऑक्टोबरला निकालाची शक्यता

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हस्तक महिलेला अत्यंत गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी कुरुलकर सध्या न्यायालयीन कोठडीत
Verdict likely on October 16 on drdo pradeep Kurulkar bail application pune
Verdict likely on October 16 on drdo pradeep Kurulkar bail application puneSakal

पुणे : संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या जामीन अर्जावर १६ ऑक्टोबर रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हस्तक महिलेला अत्यंत गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी कुरुलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

कुरुलकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सहभागी झाला होता. कुरुलकरच्या वतीने अॅड. ऋषिकेश गानू यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यातील तपास भाग पूर्ण झाला असून, कुरुलकर याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. कुरुलकरचे मोबाईल आणि लॅपटॉप तपास यंत्रणांनी जप्त केले आहेत. त्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यात आले आहे. त्याचे दोन्ही पासपोर्ट तपास यंत्रणांकडे आहेत. त्यामुळे कुरुलकर देश सोडून फरार होऊ शकत नाही.

Verdict likely on October 16 on drdo pradeep Kurulkar bail application pune
Pune News : घरगुती वादातून तरुणाची खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या; धरणाच्या मोरी जवळ आढळला मृतदेह

तसेच, जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात दररोज हजेरी देणे तसे पुणे शहर न सोडण्याच्या अटी-शर्तीवर जामीन मंजूर करावा,’ अशी मागणी अॅड. गानू यांनी केली. दरम्यान, सरकारी वकील अॅड. विजय फरगडे यांनी जामीन अर्जावरील युक्तिवादासाठी वेळ मागितली आहे. न्यायालयाने १६ ऑक्टोबरला सरकारी पक्षाला त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com