साप्ताहिक सकाळचे माजी संपादक सदा डुंबरे यांचे निधन

टीम ई-सकाळ
Thursday, 25 February 2021

साप्ताहिक सकाळला लोकप्रिय करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. सामान्य वाचकांना आवडणारी, तसेच चिंतनशील सदरे या साप्ताहिकामध्ये सुरू केली. चांगल्या लेखकांना या सदरांमध्ये लिखाण करायला लावले.

पुणे : साप्ताहिक सकाळचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांचे आज निधन झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डुंबरे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूरचे. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सकाळमधूनच पत्रकारितेला सुरवात केली. पुढे त्यांनी कोल्हापूर सकाळचे संपादक पद भूषविले. नंतर ते साप्ताहिक सकाळचे संपादक झाले. या साप्ताहिकला लोकप्रिय करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. सामान्य वाचकांना आवडणारी, तसेच चिंतनशील सदरे या साप्ताहिकामध्ये सुरू केली. चांगल्या लेखकांना या सदरांमध्ये लिखाण करायला लावले. त्यामुळे या सदरांची पुस्तकेही झाली.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुमारे 21 वर्षे ते या साप्ताहिकाचे संपादक होते. या पदावरूनच ते निवृत्त झाले. नानासाहेब परुळेकर आणि श्री. ग. मुणगेकर यांच्या पत्रकारितेचा त्यांच्यावर प्रभाव होता. तोच वारसा त्यांना पुढे चालवला. अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर त्यांनी लेखन केले.  शब्दरंग, प्रतिबिंब यासंह विविध विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. सकाळमध्ये  माझी कारकीर्द सुरु झाली. तेथे असताना मी एक ओळही दुसरीकडे लिहिली नाही, असे ते अभिमाने सांगत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran journalist editor Saptahik Sakal sada dumbre passed away