

तापमान ४७ अंशांच्या पुढे
वर्धा येथे राज्यातील उच्चांक, नागपूर ४६.६ अंशांवर
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २० : विदर्भातील उष्णलाटेने उग्र रूप धारण केले असून, बुधवारी वर्धा येथे कमाल तापमान ४७.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर, नागपूरमध्येही ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले असून, हा गेल्या दहा वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस ठरला. दरम्यान, हवामान विभागाने गुरुवारी आणखी तापमान वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे.
नागपूरमध्ये २०१३मध्ये ४७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होत असून, मंगळवारच्या तुलनेत नागपूरमधील कमाल तापमानात बुधवारी १.१ अंश सेल्सिअसची वाढ झाली. यंदा प्रथमच ४६.६ अंशांवर गेला. विदर्भातील अकरापैकी तब्बल नऊ शहरांचे तापमान ४४ अंशांच्या वर नोंदविण्यात आले. उन्हाच्या तडाख्यामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील जनजीवन विस्कळित झाले असून, उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत.
विदर्भात यलो, ऑरेंज व रेड अलर्ट
प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस यलो, ऑरेंज व रेड अलर्ट दिल्याने उन्हाचा कहर आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, अमरावती व अकोला या तीन जिल्ह्यांमध्ये उन्हाचा ‘रेड अलर्ट’ असून, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
..
विदर्भातील कमाल तापमान
शहर तापमान (अंश सेल्सिअस)
वर्धा ४७.१
नागपूर ४६.६
अमरावती ४६.४
चंद्रपूर ४६.२
अकोला ४५.२
यवतमाळ ४५.२
गडचिरोली ४५.६
गोंदिया ४४.९
भंडारा ४४.६
वाशीम ४२.६
बुलडाणा ४१.०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.