Lockdown : पठ्ठ्याने मुख्यमंत्र्यांकडेच केली दारुची मागणी; पोलिसांचेही धाबे दणाणले!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

अवैध दारू विक्रीची अड्डे दाखवण्यासाठी त्याला सोबत घेतले. तीन-चार ठिकाणी त्याला नेले. परंतु तळीरामांना भेटणारा माल पोलिसांना आढळून आला नाही.

वडगाव शेरी : लॉकडाऊनमध्ये शासनाने सर्वांचा विचार केला. परंतु ज्यांना रोज दारू पिण्याची सवय आहे, त्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये किमान रोज दोन तास दारू दुकाने उघडी ठेवा, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांकडे थेट मागणी करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ विश्रांतवाडीतील किरण कांबळे उर्फ के.के. असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने बनवला आहे.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

के.के.ने जरी व्हिडिओत त्याची मागणी मांडली असली तरी त्यात विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत लॉकडाऊन काळातही काळ्या बाजारात अवैध दारू विक्री तिप्पट दाम देऊन जोमात सुरू असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. के.के.चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांचे धाबे दणालले आहेत. के.के.ने केलेला भांडाफोड खरा की खोटा तपासण्याच्या सूचना मिळाल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी केकेला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. अवैध दारू विक्रीची अड्डे दाखवण्यासाठी त्याला सोबत घेतले. तीन-चार ठिकाणी त्याला नेले. परंतु तळीरामांना भेटणारा माल पोलिसांना आढळून आला नाही.

- Coronavirus : 'हे' आहेत जगातील 'टॉप १०' खतरनाक व्हायरस!

केकेने व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, सध्या विश्रांतवाडी भागात दीडशे रुपयाची दारुची बाटली (क्वॉटर) चारशे रुपयांना विकण्यात येत आहे. तर धानोरी, लोहगाव परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याविषयीची माहिती आणि तक्रार या भागातील लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे केली आहे. तसेच काळ्या बाजारात अवैध दारू विक्री कशी सुरू आहे, याचे कॉल रेकॉर्डिंग असलेला पुरावाही पोलिसांना दिला आहे. त्यानंतर लोहगाव येथे विमानतळ पोलिसांनी कारवाई केली.

- Coronavirus : आपण आपल्या संयमांचं अतुलनीय दर्शन घडवलं; धन्यवाद ! : मुख्यमंत्री

याविषयी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण आव्हाड म्हणाले, किरण कांबळेने दिलेल्या माहितीची शहानिशा केली; परंतु त्यात तथ्य आढळले नाही. तीन ठिकाणी तपास केला परंतु दारूचा साठा आढळला नाही.

- उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत आढळला पहिला पेशंट; रिक्षाचालकाला कोरोनाची लागण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video demanding to the CM Uddhav Thackeray for open the liquor shops in lockdown has gone viral