esakal | Video : 'झुलवा पाळणा...पाळणा, बाळ शिवाजीचा...'; शिवजयंतीनिमित्त नंदी सिस्टर्सची म्युझिकल ट्रीट 

बोलून बातमी शोधा

nandy sisters_shiv jayant}

शिवजयंतीनिमित्त खास पाळणा गीत गात नंदी सिस्टर्सनं एक म्युझिकल ट्रिट दिली आहे. या गीताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

Video : 'झुलवा पाळणा...पाळणा, बाळ शिवाजीचा...'; शिवजयंतीनिमित्त नंदी सिस्टर्सची म्युझिकल ट्रीट 
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी झाली. यानिमित्त अनेकांनी विविधप्रकारे शिवरायांना मानवंदना दिली. यामध्ये नंदी सिस्टर्स नावानं प्रसिद्ध असलेल्या दोन गायिका-संगितकार बहिणींचाही समावेश होता. त्यांनी शिवजयंतीनिमित्त खास पाळणा गीत गात एक म्युझिकल ट्रिट दिली आहे.  या गीताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. 

आश्चर्यकारक! शार्कच्या पिलाच्या चेहऱ्याचं माणसाच्या चेहऱ्याशी साम्य

बाळ शिवाजीचा पाळणा हे फ्युजन प्रकारातलं गीत नंदी सिस्टर्सनं अप्रतिम गायलं आहे. गाण्याच्या अप्रतिम शब्दांना नंदी सिस्टर्सच्या मधूर आवाजाचा साज आणि गिटार, घुंगरु, टाळ्यांच्या आवाजावर दिलेलं याच संगीतही अप्रतिम आहे. अस्सल महाराष्ट्रीयन नऊवारी साडी आणि डोक्यावर भगवा फेटा या वेषात या नंदी सिस्टर्सनं हे पाळणा गीत सादर केलं आहे. 

कोण आहेत या नंदी सिस्टर्स?

अंतरा नंदी आणि अंकिता नंदी या दोन सख्या बहिणी असून नंदी सिस्टर्स या नावानं त्या एकत्रच गाण्याचे कार्यक्रम करतात. या दोघी मूळच्या आसामच्या असून सध्या पुण्यात राहतात. यांपैकी अंतरा ही पार्श्वगायिका असून तिने विविध चित्रपटांची गाणी गायली आहेत. अंतरा आणि अंकिता या दोघींनी प्रायोगिक तत्वावर केलेल्या कप आणि क्लॅप म्युजिकसह 'पिंगा' आणि 'हम्मा हम्मा' ही गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती, यानंतर या दोघी प्रकाशझोतात आल्या. २००९ मधील झी टीव्हीवरील 'सारेगमपा लिटल चॅम्प' या सांगितीक कार्यक्रमात टॉप थ्री स्पर्धकांमध्ये अंतरा नंदीचा सहभाग होता.

ऐकावं ते नवलचं! त्यानं चक्क विजेच्या खांबावर केला व्यायाम; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, यंदाच्या शिवजयंतीनिमित्त या दोन्ही बहिणींनी शिवाजी महाराजांचं गाण गाऊन त्यांना मानवंदना देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी त्यांना अमेय थोरात यांनी हे पाळणा गीत सुचवलं तसेच मराठी शब्दांचे योग्य उच्चार कसे करायचे यासाठी मदत केली. तसेच अंजली देवकाते यांनी त्यांची वेशभूषा केली. तर या गीताचं साउंड डिझाइन बॉब फुकान यांनी केलं आहे. यानंतर दोघींना मराठी येत नसतानाही त्यांनी अप्रतिमरित्या हे गीत सादर केलं. अंतरानं आपल्या युट्यूब चॅनेलवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला बातमी लिहिपर्यंत ८२,६९२ व्ह्यूज तर सुमारे ९,००० लाईक्स मिळाले आहेत.