cm devendra fadnavis
sakal
पुणे - विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची पुण्यातील जागा मिळविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असून, आज भाजपच्या पुणे शहर व जिल्ह्यातील आमदारांनी व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पुणे शहर व जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे, ही जागा आपण जिंकू शकतो. ती राष्ट्रवादीला न सोडता आपल्याकडेच असली पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यामुळे या जागेवर आता महायुतीतील नेते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.