Vidhan Sabha 2019: आम्ही मतदान करणार, तुम्हीही मतदान करा...! (Video)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

खर तर त्यांचही इतर कष्टकऱ्यांप्रमाणेच हातावरचं पोटं. "त्या' दररोज घरोघरी जाऊन कचरा घेतात, घरातल्यांशी संवाद साधतात. हाच विश्‍वासाचा धागा पकडून कचरावेचक महिलांनी घरोघरी जाऊन "मी मतदान करणार आहोत, तुम्हीही मतदान करा' असा मोलचा संदेश दिला आहे.

पुणे - खर तर त्यांचही इतर कष्टकऱ्यांप्रमाणेच हातावरचं पोटं. "त्या' दररोज घरोघरी जाऊन कचरा घेतात, घरातल्यांशी संवाद साधतात. हाच विश्‍वासाचा धागा पकडून कचरावेचक महिलांनी घरोघरी जाऊन "मी मतदान करणार आहोत, तुम्हीही मतदान करा' असा मोलचा संदेश दिला आहे. साडे तीन हजार कचरावेचक महिलांनी शहरातील आठ लाख घरे, संस्था, खासगी-सरकारी कार्यालये, बॅंकांमध्ये जनजागृती केली आहे. विशेषतः स्वतःचे व्हिडीओ बनवून लाखो मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न कचरावेचक महिलांनी केला आहे.

शहरातील वस्त्या, सोसायट्या, उच्चभ्रु सोसायट्या, बंगले, व्यावसायिक संकुले, खासगी व सरकारी कार्यालये, बॅंका, शैक्षणिक संस्था यांसारख्या असंख्य ठिकाणी पुणे महापालिकेच्या "स्वच्छ' या संस्थेच्या कचरावेचक महिला दररोज कचरा उचलतात. त्यामुळे संबंधित कचरावेचक महिलांचा थेट प्रत्येक कुटुंबीयांशी संवाद होतो. त्याचबरोबर कचरा संकलन, वर्गीकरण करताना अनेकजण भेटतात. त्या प्रत्येकास कचरावेचकांकडून सध्या "आम्ही मतदान करणार आहोत, तुम्हीही मतदान करा' असा संदेश दिला जात आहे. कचरावेचक अन्य कष्टकऱ्यांप्रमाणेच हातावर पोट असणारा घटक आहे. असे असतानाही त्यांच्याकडून जाणीवपुर्वक मतदानाचा हक्क बजावला जातो. मागील एक आठवड्यापासून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. सोसायट्यांबरोबरच कचरावेचक राहात असलेल्या वस्त्यांमध्ये या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

""मतदानाचा हक्क बजावणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. आपल्याला योग्य वाटणाऱ्या, आपल्या समस्या सोडवू शकणाऱ्यांना आपण मतदान करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. मी जेथे काम करते, त्या ठिकाणी सर्वांना मतदान करण्यासंदर्भात मी विनंती केली आहे.''
- ज्योती वाघमारे, कचरावेचक.

""कचरावेचकांस कष्टकरी न चुकता मतदानाचा हक्क बजावतात. त्यामुळे त्यांनी लोकांना मतदान करण्याबाबत जागृती करणे हे महत्वाचे आहे. शहरात साडेतीन हजार कचरावेचक असून त्यांनी आत्तापर्यंत आठ लाख घरे, संस्था, कार्यालयांपर्यंत आपला संदेश पोचविला आहे.''
- सुचिस्मीता पै, व्यवस्थापक, स्वच्छ आऊटरीच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 appealing to voters to vote in pune