Vidhan Sabha 2019 : दौंड तालुक्यात दुपारी तीन पर्यंत 49.2 टक्के मतदान

प्रफुल्ल भंडारी
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

दौंड (पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढत असून दुपारी तीन वाजेपर्यंत ४९.२ टक्के मतदान झाले आहे. सतत तीन दिवस पावसाची रिपरिप सुरू असताना मतदानाच्या दिवशी पावसाने दुपारी साडेचार वाजेपर्यंत उघडीप दिल्याने मतदार, प्रशासन व उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

दौंड (पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढत असून दुपारी तीन वाजेपर्यंत ४९.२ टक्के मतदान झाले आहे. सतत तीन दिवस पावसाची रिपरिप सुरू असताना मतदानाच्या दिवशी पावसाने दुपारी साडेचार वाजेपर्यंत उघडीप दिल्याने मतदार, प्रशासन व उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

आज (सोमवार) सकाळी सात वाजता ढगाळ वातावरणातच ३०६ मतदानकेंद्रांवर मतदानाला सुरवात झाली. मतदारसंख्या ३,०९,१६८ इतकी असून एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गिरीम येथील जाधववाडी मतदान केंद्रावर सकाळी इव्हीएम यंत्र बद पडल्याने मतदारांना पर्यायी यंत्र येईपर्यंत ताटकळत थांबावे लागले. तालुक्याच्या बहुतांश भागात १८ ऑक्टोबर पासून पावसाची रिपरिप झाल्याने अनेक मतदानकेंद्रांच्या प्रवेशमार्गांवर चिखल झाला होता. मतदारांना चिखल तुडवतच मतदानासाठी जावे लागले. त्याचबरोबर शहरातील अनेक मतदानकेंद्रांवर ज्या ठिकाणी ईव्हीएम यंत्र होते तेथे पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने मतदारांना अंधारात मतदान केले. सकाळपासून कडक ऊन - ढगाळ वातावरण व पुन्हा ऊन असा प्रकार सुरू आहे.

दौंड उप विभागाच्या पोलिस उप अधीक्षक तथा परिविक्षाधीन आयपीएस ऐश्वर्या शर्मा यांनी ठिकठिकाणी मतदानकेंद्र परिसराची पाहणी करीत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. मतदारसंघात सकाळी ७ ते ९ दरम्यान ६.३५ टक्के, ९ ते ११ दरम्यान १२.३ टक्के, सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत २९.३ टक्के तर दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत ४९.२ टक्के मतदान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 daund taluka 49 percent voting at 3pm