Vidhan Sabha 2019 : खडकवासला येथे तीन वाजेपर्यंत 38 टक्के मतदान

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

खडकवासला (पुणे) : खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी तीन वाजेपर्यंत या आठ तासात 38 टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या टप्यात मतदान करणाऱ्यांमध्ये दुपारनंतर महिला मतदारांची संख्या वाढली आहे.

एकूण 4लाख 86 हजार मतदारांपैकी पहिल्या चार तासात 75 हजार 668 जणांनी मतदान केले होते. दुपारी एक वाजेपर्यंत एक लाख 83 हजार 938 जणांनी मतदान केले आहे. यामध्ये पुरुष एक लाख चार हजार 083 ते महिला 79 हजार 855 मतदारांनी मतदान केले आहे.

खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षक साजिद इस्लाम रशीद या विविध मतदान केंद्रावर जाऊन थेट भेट घेत असल्याने निवडणूक यंत्रणेवर त्यांचे लक्ष आहे. त्यांच्या समवेत अन्य अधिकरी होते. सनसिटी, शिवणे, उत्तमनगर, परिसरात भेट दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 khadakwasala 38 percent voting at 3pm