Vidhan Sabha 2019 : 'चंद्रकांत पाटील हे तर ‘पॅराशूट’ उमेदवार'!

टीम ई-सकाळ
Sunday, 13 October 2019

पुणे : सरकार बदलले तरीही पुण्यातील प्रश्‍न कायम आहेत. महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे नेते व भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे कोथरुडकरांवर लादलेले ‘पॅराशूट’ उमेदवार आहेत, असा टोला आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना ‘आप’चे उमेदवार डॉ. अभिजित मोरे चांगली लढत देतील, असा विश्वास चड्डा यांनी व्यक्त केला.

आरे कॉलनीत गवत लावणार का? राज ठाकरेंचा सवाल

आपसारखा विकास करून दाखवा
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रस्थापित पक्षांना महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्‍न सोडवायचे नाहीत. याउलट आम आदमी पक्षाने पाच वर्षाच्या कालावधीत शिक्षण, आरोग्य, वीज, पाण्याबाबत विकासाचा ‘दिल्ली पॅटर्न’ निर्माण केला. हिम्मत असेल, तर भाजपने हा ‘आप’ सारखा विकास करूनच दाखवावा, असे आव्हानही यांनी दिले. शहराच्या विविध मतदारसंघामध्ये "आप'च्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चड्डा यांनी रविवारी प्रचार केला. तर सायंकाळी फडके हॉल येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पक्षाचे श्रीकांत आचार्य यांच्यासह मुकुंद कीर्दत (शिवाजीनगर), संदीप सोनावणे (पर्वती), डॉ. अभिजित मोरे (कोथरूड), गणेश ढमाले (वडगाव शेरी) उमेदवार उपस्थित होते.

अजान सुरू होताच राहुल गांधींनी थांबवले भाषण

दिल्लीकरांना विकास दाखवला
चड्डा म्हणाले, ‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व ‘आप’ सरकारने दिल्लीमध्ये कमी वीज बील, मोफत पाणी, सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण, नागरिकांसाठी उपयुक्त आरोग्य सुविधा देऊन दिल्लीकरांना विकास दाखविल्याचे चड्डा यांनी सांगितले. ‘केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्यामुळे तिथे आत्महत्या होत नाहीत, याउलट महाराष्ट्रातील स्थिती आहे. प्रस्थापित पक्ष वर्षानुवर्षे मते घेतात. परंतु, इथले प्रश्‍न सोडवीत नाहीत. म्हणूनच ‘आप’च्या रूपाने सक्षम पर्याय आम्ही दिला आहे.’ कार्यकर्त्यांचे बॅंक, बॅलन्स पाहून नाही, तर त्यांची इमानदारी पाहून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असल्याचेही चड्डा यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांनी लोकांच्या प्रश्‍नांवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी खुल्या चर्चेत सहभागी व्हावे, असे आव्हान डॉ.  मोरे यांनी दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 pune kothrud chandrakant patil parashoot candidate aap raghav chadda satement