Vidhan Sabha 2019 : 'तू माह्या लेकासारखाच हायिस पोरा...'

Vidhan Sabha 2019 Sunil Kamble leads in the election campaign
Vidhan Sabha 2019 Sunil Kamble leads in the election campaign

कॅन्टोन्मेंट : उमेदवार म्हणून एखाद्या वस्तीत मत मागण्यासाठी फिरत असताना एक ज्येष्ठ महिला समोर येते. आपल्या आईच्या वयाची महिला पाहून उमेदवार आपसूकच खाली वाकून तिच्या पायांना स्पर्श करतो आणि त्या माऊलीच्या तोंडूनही सहज उद्गार बाहेर पडतात... तू माह्या लेकासारखाच हायिस पोरा.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना शिंदे छत्री परिसरात प्रचारादरम्यान हा अनुभव आला. निवडणुकीसाठी मताचा जोगवा मागत दारोदार फिरणे हा पूर्णवेळ कार्यक्रम सध्या सर्व पक्षांच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. समाजातील विविध घटक, विविध समूह आणि नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचे काटेकोर प्रयत्न सुरू आहेत. परंतु या सगळ्या धामधुमीत असा हृद्य अनुभव उमेदवाराचे बळ दहापटींनी वाढवून जातो.

समाज भाजपच्या पाठीशी पुन्हा उभा राहीन- सुनील कांबळे

सुनील कांबळे यांची शिंदे छत्री परिसरात पदयात्रा सुरू होती. त्यावेळी ते समोर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हात जोडून नमस्कार करीत होते. काही महिला स्वतःहून पुढे येऊन त्यांना ओवाळणी करीत होत्या. सोबत पक्षाचे कार्यकर्तेही होते. अशी ही पदयात्रा वस्तीवस्तीतून पुढे सरकत होती. एका वस्तीतून जात असताना समोरून एक ज्येष्ठ महिला आली. आपल्या आईच्या वयाची महिला पाहून कांबळे यांनी आपसूकच तिच्या पायांना स्पर्श करून तिचे आशिर्वाद घेतले. तेव्हा त्या महिलेने सुनीलभाऊंना आशिर्वाद तर दिलेच पण त्यांच्या तोंडून सहजच शब्द निघाले, तू माह्या लेकासारखाच हायिस पोरा... हे उद्गार ऐकून सुनील कांबळे यांच्यासह सोबतचे कार्यकर्तेही गहिवरले.

बहुमताने निवडून येण्याचा सुनील कांबळेंना विश्वास

शिंदे छत्री परिसरातील अनेक वस्त्या पिंजून काढण्यात आल्या. प्रत्येक घरातील नागरिकांसमोर हात जोडून त्यांना मत देण्याची विनंती करण्यात आली. या पदयात्रे दरम्यान महिला, ज्येष्ठ नागरिक, मुस्लिम, सिंधी समाजाचे नागरिक यांचा कांबळे यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या पदयात्रेत सामान्य नागरिक स्वतःहून सामील होत आहेत. या परिसरातील अनेक समस्या गेल्या पाच वर्षांत सोडविल्या गेल्यामुळे तसेच अनेक नागरिकांना नव्या सुविधा व रोजगाराची साधने मिळाल्यामुळे त्यांचा कांबळे यांना खंबीर पाठिंबा लाभत आहे.

राजकारणातील वाईट प्रवृत्तींचा नायनाट करू- कांबळे 

पदयात्रेत कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित, कोमल शेंडकर, संतोष इंदुरकर, नगरसेवक कालिंदी पुंडे, धनराज घोगरे, उमेश गायकवाड, दिनेश होले यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com