Vidhan Sabha 2019 मतदान करणाऱ्यांची मोफत दाढी-कटिंग

डाॅ. संदेश शहा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

इंदापूर विधानसभेसाठी मतदान सुरू असताना उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पुनर्वसित कालठण न. 1 येथील हनुमंत रामचंद्र पांडुळे या युवकाने मतदान करणाऱ्यांसाठी मोफत दाढी-कटिंग करण्याचा अनोखा उपक्रम राबविला. त्यांनी 35 मतदाररांच्या दाढी-कटिंग मोफत केल्या आहेत.

इंदापूर (पुणे) : इंदापूर विधानसभेसाठी मतदान सुरू असताना उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पुनर्वसित कालठण न. 1 येथील हनुमंत रामचंद्र पांडुळे या युवकाने मतदान करणाऱ्यांसाठी मोफत दाढी-कटिंग करण्याचा अनोखा उपक्रम राबविला. त्यांनी 35 मतदाररांच्या दाढी-कटिंग मोफत केल्या आहेत.

हनुमंत पाटील यांचे कालठण न. 1 येथे आर्यन हेअर स्टाइल हे दुकान आहे. भारतीय लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपला देखील खारीचा वाटा असावा म्हणून त्याने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने मतदान करून आलेल्या तसेच बोटावर मतदान केल्याची खूण असलेल्या 35 जणांची मोफत दाढी-कटिंग केली. ग्रामीण व शहरी भागात दाढी व कटिंगचे दर 60 ते 80 रुपये असताना देखील हनुमंत पांडुळे यांनी मतदारांना संपूर्ण मोफत सेवा देऊन सामाजिक बांधीलकी जपली. त्यांचा उपक्रम इतरांना प्रेरणादायी असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019