Vidhan Sabha 2019 वेल्ह्यात कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज

मनोज कुंभार
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

वेल्हे (पुणे) : विधानसभा निवडणुकीमध्ये वेल्हे तालुक्‍यातून कॉंग्रेसचे संग्राम थोपटे यांना मागील निवडणुकीपेक्षा समाधानकारक मते मिळाली नाहीत. शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांच्या मतांमध्ये या वेळी वाढ झाली आहे. त्यामुळे वेल्हे तालुक्‍यात कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे.

 

 

वेल्हे (पुणे) :  वेल्हे (पुणे) : विधानसभा निवडणुकीमध्ये वेल्हे तालुक्‍यातून कॉंग्रेसचे संग्राम थोपटे यांना मागील निवडणुकीपेक्षा समाधानकारक मते मिळाली नाहीत. शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांच्या मतांमध्ये या वेळी वाढ झाली आहे. त्यामुळे वेल्हे तालुक्‍यात कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे.

वेल्हे तालुक्‍यात मागील निवडणुकीमध्ये एकूण 46491 मतदान होते. त्यापैकी 32009 एवढे मतदान झाले होते तर या वेळी एकूण मतदान 49937 असून 32602 मतदान झाले आहे. थोपटे यांना 18187 मते मिळाली आहेत. मागच्या निवडणुकीत 15903 एवढी मतदान झाले होते. तसेच शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांना मागील निवडणुकीत 8122 मतदान झाले होते. तर या वेळी त्यांना 13493 मतदान झाले आहे. याचा अर्थ मागील निवडणुकीत थोपटेंना 7781चे मताधिक्‍य होते. या वेळी ते कमी होऊन 3087 वर आले आहे. वेल्हे पंचायत समितीवर कॉंग्रेसची सत्ता असून, दोन जिल्हा परिषद सदस्य, तर सभापती व उपसभापतीदेखील कॉंग्रेसचेच आहेत. या वेळी मताधिक्‍य वाढणे आवश्‍यक होते, परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम केले नसल्याची चर्चा वेल्हे कॉंग्रेस करीत आहे. शिवसेनेसाठी वेल्हे तालुक्‍यातून भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान पासलकर, आनंद देशमाने, दत्ता देशमाने, अशोक रेणुसे, शैलेंद्र वालगुडे, बाळासाहेब देशपांडे, अण्णा शिंदे, संदीप दिघे, नंदू खुळे आदींना काम केले आहे. जिल्हा परिषद विंझर कुरण खुर्द गटातून संग्राम थोपटे यांना 9362 तर शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांना 6574 मते मिळाली आहेत. वेल्हे मार्गासनी गटातून संग्राम थोपटे यांना 8825 व कुलदीप कोंडे यांना 6919 मते मिळाली. दोन्ही जिल्हा गटातून संग्राम थोपटे यांना कोंडेंपेक्षा 4694 मताधिक्‍य मिळाले आहे. सभापती संगीता जेधे यांच्या वेल्हे येथे शिवसेनेला 805 व कॉंग्रेसला 789 मतदान झाले असून पाबे येथून शिवसेनेला 401, तर कॉंग्रेसला 358 मतदान झाले आहे. विंझर येथून शिवसेनेला 569 व कॉंग्रेसला 407 मतदान झाले आहे. माजी सभापती सीमा राऊत व कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना राऊत यांच्या अंत्रोली येथून कॉंग्रेसला 434 व शिवसेनेला 168, तर जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांच्या निगडे मोसे येथून कॉंग्रेसला 460 व शिवसेनेला 138 मतदान झाले. जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांच्या वांजळे येथून कॉंग्रेसला 226 व शिवसेनेला 166 मतदान झाले आहे. माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर व युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर यांच्या दापोडे येथून कॉंग्रेसला 459 व शिवसेनेला 433 मतदान झाले. उपसभापती दिनकर सरपाले यांच्या सोंडे सरपाला येथून कॉंग्रेसला 570 व शिवसेनेला 315

मतदान झाले. अठरा गाव परिसरात शिवसेनेला मतदारांचा जास्त कौल दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019