Vidhan Sabha 2019 "दिलीप वळसे तुम्ही निवडणुकीच्या कॅटेगरीत बसत नाही''

Valasepatil
Valasepatil

मंचर (पुणे) : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून 1985 मध्ये निवडणूक लढविण्याची इच्छा मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. पण त्या वेळी ते मला म्हणाले, "तुम्ही अजून निवडणूक लढविण्याच्या कॅटेगरीत बसत नाही. त्यामुळे थोडे थांबा'', असा पवार साहेबांनी दिलेला सल्ला मी पाळला. त्यामुळेच सलग सात वेळा उच्चांकी मताधिक्‍क्‍याने विजयी झालो. माझ्या राजकारणातील यशाचे सर्व श्रेय शरद पवार यांनाच आहे, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

निरगुडसर येथे भाऊबीजनिमित्त आयोजित केलेल्या आभार बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. या वेळी प्रतापराव वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, सरपंच ऊर्मिला वळसे-पाटील, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, के. जी. वळसे पाटील, फकिरा वळसे पाटील, प्रमोद वळसे पाटील, श्‍यामराव टाव्हरे, मेंगडेवाडी, निरगुडसर, जवळे भराडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, ""पवार साहेबांचं ज्यांनी-ज्यांनी ऐकलं त्यांचं भलं झालं आहे. त्यांचे सल्ले न ऐकलेल्या मान्यवरांचे राजकारण काय होते हे आपण सर्व जण पाहत आहोत. 1981 मध्ये माझे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाले. पवार साहेबांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला. चौफेर वाचन, प्रचंड आत्मविश्वास, जिद्द वक्तशीरपणा व समयसूचकता हे त्यांच्याकडे असलेले गुण मी अनुभवले आहेत. राजकारणात प्रतिकूल व अनुकूल परिस्थितीत कसे वागावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. सर्व निवडणुकांमध्ये गावकऱ्यांनी, आंबेगाव व शिरूर तालुक्‍यांतील 39 गावांनी तसेच जुन्नर तालुक्‍यातील 14 गावांनी दिलेली साथ मी कधी ही विसरू शकणार नाही.'' पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पोपटराव मेंगडे, रमेश खिलारी, गोविंद खिलारी, डॉ. शांताराम गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.

साताऱ्यातला पाऊस आणि इकडचा पाऊस
भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांनी भाषणात पावसामुळे मतदानाची टक्केवारी घसरली, असा युक्तिवाद केला होता. हा धागा पकडून वळसे-पाटील म्हणाले, ""अहो साताऱ्यात पवार साहेब न विचलित होता मुसळधार पावसात भाषण करत होते. या पार्श्वभूमीवर आपण मतदानाच्या टक्केवारीत का कमी पडलो, याचे आत्मचिंतन कार्यकर्त्यांनी करावे,'' असे सांगितल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com