Vidhan Sabha 2019 सुरेश गोरे म्हणतात, भाऊ नको भाई म्हणा

हरिदास कड
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

खेडचे माजी आमदार सुरेश गोरे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन गोरे यांच्याकडून करण्यात आले होते. त्या वेळी गोरे म्हणाले, ""कार्यकर्त्यांनो मला आता भाऊ म्हणू नका, भाई म्हणा. मी आता भाऊ राहिलेलो नाही. मी भाईगिरी करणार आहे.''

चाकण (पुणे) : खेडचे माजी आमदार सुरेश गोरे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन गोरे यांच्याकडून करण्यात आले होते. त्या वेळी गोरे म्हणाले, ""कार्यकर्त्यांनो मला आता भाऊ म्हणू नका, भाई म्हणा. मी आता भाऊ राहिलेलो नाही. मी भाईगिरी करणार आहे.''

गोरे म्हणाले, "येत्या पाच वर्षांत कोणी ठोसा दिला, तर त्याला माझा ठोका आहे. मी पुन्हा येणार आहे, तालुक्‍याच्या विकासासाठी. या निवडणुकीत मित्रांनी घात केला. मी कोणालाही सोडणार नाही. ज्या लोकांना तुम्ही निवडून दिले ते तालुक्‍यासाठी काहीच करणार नाहीत. तालुक्‍याच्या विकासासाठी मी पुन्हा येणार आहे.''

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले, की खेड तालुक्‍यात मित्रपक्षाने दगाबाजी केली, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. याबाबत पक्षाने दखल घ्यावी, असे मी पक्षप्रमुखांना कळविले आहे. या वेळी रामदास धनवटे, किरण मांजरे, विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

दुसऱ्या बाजूला नवनिर्वाचित आमदार दिलीप मोहिते यांची तालुक्‍यात अण्णागिरी सुरू झाली आहे. मोहिते यांनी सांगितले, की खेड तालुक्‍याचा गेल्या पाच वर्षांत काहीच विकास झाला नाही. तालुक्‍याला निष्क्रिय आमदार मिळाला, त्यामुळे तालुक्‍याचे खूप नुकसान झाले. तालुक्‍याचा विकास करण्यावर मी भर देणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019