Vidhan Sabha 2019: उमेदवारांचे भवितव्य आज होणार ‘लॉक’

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

विधानसभा 2019 :
पुणे -  पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील तब्बल २४६ उमेदवारांचे भवितव्य  आज (सोमवारी) मतदान यंत्रात बंद होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत भाजप-शिवसेना महायुती विरुद्ध काँग्रेस आघाडी अशी सरळ लढत होत आहे. मनसे, आप आणि वंचित आघाडी या पक्षांचे उमेदवारही काही मतदारसंघांत आपले नशीब आजमावत आहेत. 

पुणे जिल्ह्यात पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सर्वाधिक २८ उमेदवार रिंगणात असून, सर्वांत कमी सहा जण आंबेगाव मतदारसंघात आहेत. हडपसर मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ४ हजार मतदार असून, सर्वांत कमी २ लाख ८३ हजार मतदार आंबेगाव मतदारसंघात आहेत. जिल्ह्यातील २१ पैकी १७ विद्यमान आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत.

पुणे शहरातील आठ मतदारसंघांत आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, अश्‍विनी कदम, योगेश दोडके, चेतन तुपे, वसंत मोरे, विशाल धनवडे, सुनील टिंगरे हे नगरसेवकही विधानसभेच्या मैदानात  उतरले आहेत. 

पुण्यात कोथरूड मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षपुरस्कृत मनसेचे उमेदवार किशोर शिंदे, अशी लढत होत आहे. पाटील हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे  जात आहेत.

जिल्‍ह्यात चुरशीच्या लढती
पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जागांवर चुरशीच्या लढती असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि वळसे पाटील हे आपल्या पारंपरिक मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पवार यांचा सामना भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यासोबत होत आहे. पुरंदरमध्ये विजय शिवतारे, तर मावळमध्ये बाळा भेगडे या दोन्ही मंत्र्यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha The fate of the MLA candidates today