Vidhan Sabha 2019: शहरातील सखी मतदान केंद्रे नटली

Vidhan Sabha 2019: शहरातील सखी मतदान केंद्रे नटली

विधानसभा 2019 :
पिंपरी - महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही ‘सखी’ मतदान केंद्राची स्थापना केली आहे. पिंपरीगाव, पिंपळे निलख आणि निगडी अशा तीन ठिकाणी ‘सखी बूथ’ तयार करण्यात आला आहे. ती महिलांसाठी विशेष सेवा असल्याने अधिकाधिक आकर्षक आणि फुलांची सजावट, रांगोळी व तेथील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणुकीत महिलांचे, महिलांनी महिलांसाठी चालविलेले ‘सखी मतदान केंद्र’ ही निवडणूक आयोगाची संकल्पना आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र करण्यात आले आहे. मतदान केंद्रात पाच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यानुसार सखी मतदार केंद्रांवर नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी सर्व महिला असतात. त्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सहायक, कर्मचारी यांचा समावेश असतो. त्याशिवाय पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वेगळी असते. लोकसभा निवडणुकीत सखी केंद्राला महिला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

पिंपरी विधानसभेत मतदान केंद्र क्रमांक २०४ हे पिंपरी गावातील विद्यानिकेतन प्राथमिक शाळा ही केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडले आहे. भोसरी मतदारसंघात निगडी यमुनानगरमधील अमृतानंदमयी शाळेत केंद्र आहे; तर चिंचवड मतदारसंघात पिंपळेनिलख शाळेतील मतदान केंद्र क्रमांक  ३५८ हे केंद्र आहे. महिलांसाठी विशेष सेवा असल्याने केंद्रात आवश्‍यक त्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. रांगोळ्या, फुगे लावून हे मतदार केंद्र सजविण्यात येणार आहेत. पाळणाघराची सोय केलेली असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com