जुन्नर, खेडसाठी काँग्रेस आग्रही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

राजगुरुनगर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपामध्ये खेड-आळंदी आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची मागणीही केली आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी येथे सांगितले. 

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथे गुरुवारी (ता. २०) आयोजित केलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने सन २००९ ची विधानसभा निवडणूक एकत्रित लढविली होती.

त्यानंतर १० वर्षांत रचना खूप बदलली असल्याने त्या वेळचे जागावाटप आता ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणून जिल्ह्यात आम्ही इतर मतदारसंघाबरोबर खेड-आळंदी, जुन्नर या मतदारसंघांसाठी आग्रही आहोत. खेड-आळंदी मतदारसंघ गेल्या वेळी शिवसेनेकडे गेला. अमोल पवार यांच्यासह अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. शिरूरमध्ये तीन वेळा शिवसेनेचा खासदार झाला आहे.

म्हणजेच मित्रपक्षाबाबत या ठिकाणी नकारात्मकता दिसत आहे. म्हणून काँग्रेस हा मतदारसंघ मागत आहे, असे जगताप यांनी सांगितले.  जुन्नरमध्ये सत्यशील शेरकरांच्या रूपाने काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. शिरूर लोकसभेसाठी महेश ढमढेरे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. शिरूरची जागा काँग्रेसला मिळाल्यास चमत्कार घडू शकतो, असेही जगताप म्हणाले.

Web Title: Vidhansabha Election Junnar Khed Congress Politics Sanjay Jagtap