Vidyanand Bapat AI Deepfake Video Viral
esakal
पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. विशेषतः डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांची भूमिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवपूर्व बैठकीत त्यांनी डीजेच्या वापराला विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्यावर हल्लाही झाला. मात्र, या सगळ्यानंतरही आपली भूमिका बदलणार नसल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं आहे.