Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांना २४ तास पोलिस सुरक्षा; पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत खडसावलं

Vidyanand Bapat Attacked in Pune: पोलिसांनी पुन्हा एकदा गणेश मंडळांसोबत एक सविस्तर बैठक घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपीवर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
pune ganeshotsav

pune ganeshotsav

esakal

Updated on

Pune activist Vidyanand Bapat assaulted on camera over festival noise debate: पुणे शहरातील गणेशोत्सवात आवाजाच्या मर्यादा पाळल्या जाव्यात, यासाठी सातत्याने माध्यमांमध्ये भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. संतोष चव्हाण नामक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने त्यांना माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी संतोष चव्हाणला ताब्यात घेतलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com