
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्या प्रकरणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे उपमुख्यंमत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. अर्ध्या तासात काय कट रचला हे विचारायचे आहे. कृषिमंत्र्यांचा राजीनामा झाला नाही आणि न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, शाहू, फुले, आंबेडकर या तीन शब्दांवर मी इथे आलो आहे. याच्यावर दादा काय भूमिका मांडतात हे पाहावे लागेल, असे घाडगे यांनी माध्यंमांशी बोलताना सांगितले.