शिवतारेंची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये : विनय शिवतारे

Vijay-Shivtare
Vijay-Shivtare

सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये; अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे चिरंजीव विनय शिवतारे यांनी दिली आहे. 

याबाबतीत कार्यालयातून स्विय सहायकांनी ही रात्री उशिरा माहिती दिली. शिवतारे पुरंदरला शनिवारी दौऱ्यावर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. याबाबत स्थानिक रुग्णालयात तपासण्या केल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिवतारे यांचे चिरंजीव विनय यांनी त्यांना लीलावती रुग्णालयात आणले. मात्र तिथेच दाखल करावे लागले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

विनय शिवतारे म्हणाले, 2012 साली केलेल्या उपोषणानंतर त्यांची किडनी दुखावली होती. त्यानंतर वरचेवर उपचार करून डॉक्टरांनी किडनीचे कार्य व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी अधूनमधून शिवतारे यांना त्रास जाणवतो. यावेळी मात्र किडनीचे कार्य बिघडल्यामुळे त्याचा परिणाम हृदयावर होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे शनिवारी ते अस्वस्थ झाले होते. ते अतिदक्षता विभागात असून गुरुवारी सर्व चाचण्यांचे अहवाल पाहून पुढील उपचाराबाबत डॉक्टर निर्णय घेणार आहेत, असेही विनय शिवतारे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com