‘पद्मश्री पुरस्कार मिळविण्यासाठी विक्रम गोखलेंचा केविलवाणा प्रयत्न’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पद्मश्री पुरस्कार मिळविण्यासाठी विक्रम गोखलेंचा केविलवाणा प्रयत्न’

‘पद्मश्री पुरस्कार मिळविण्यासाठी विक्रम गोखलेंचा केविलवाणा प्रयत्न’

पुणे : विक्रम गोखलें सारख्या ज्येष्ठ कलावंताने 'भीख में आझादी' या वक्तव्याचे समर्थन करणे म्हणजे केंद्र सरकारला खूष करून पद्मश्री मिळविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न दिसतो,’’ असा पलटवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी सोमवारी केला.

हेही वाचा: VIDEO: "स्वातंत्र्य 'भीक' असेल तर सावरकरांना 'भिक्षावीर' म्हणावं का?"

भीख में आझादीच्या वक्तव्याचे गोखले यांनी यांनी समर्थन एका कार्यक्रमात पुण्यात नुकतेच समर्थन केले. या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, ‘‘त्यावेळी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना फासावर लटकवले गेले, पण मोठ्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असे विक्रम गोखले यांचे म्हणणे आहे. असं वक्तव्य करून केंद्र सरकारमधील भाजप नेत्यांना खूश करून पुढच्या वर्षी पद्मश्री मिळेल यासाठी तर हा केविलवाणा प्रयत्न दिसत आहे.’’

जर स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपण स्वातंत्र्यासाठी लढताना दिसलो असतो. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदान ना भिकेची उपमा देऊन त्यांच्या भावनांशी खेळण्याचा कुठल्याही कलावंताला अधिकार नाही. ज्यावेळी स्वातंत्र्य लढा दिला गेला त्यावेळी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले जर त्यावेळेच्या आजादी भीक होती तर इतक्या स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्मा पत्करायची काय गरज होती? जर 2014 पूर्वी आजादि नसती तर गोखले कुणा एखादा इंग्रजांच्या घरी काम करताना दिसले असते ना की चित्रपटात भूमिका करताना.इतकं भान जरी ठेवले तरी विक्रम गोखले यांना आजादी ची परिभाषा लक्षात येईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार: आरोपी अनिल बोंडेंसह इतर भाजप नेत्यांना जामीन मंजूर

चित्रपट क्षेत्रातील प्रवास हा 2014 च्या किती तरी पूर्वीचा आहे त्यांच्या म्हणन्या प्रमाणे जर स्वातंत्र 2014 नंतर च आहे तर 2014 पूर्वीचा त्यांचा चित्रपटाचा यशवी प्रवास हा गुलामगिरीतला आहे का?आणि जर गुलामगिरीतला असेल तर त्यावेळेस त्यांचे स्वतंत्र साठी काय योगदान आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून सर्वांना समानतेची वागणूक आणि कायद्याने स्वतंत्र कधीच देऊन टाकले आहे. असे जर नसते तर कंगना राणावत आणि विक्रम गोखले सारख्या कलावंतांना चित्रपट क्षेत्रात काम करता आल असतं का साधा प्रश्न उपस्थित होतो? म्हणून या दोघांना 2014 नंतर स्वतंत्र अपेक्षित आहे तर त्यांनी ज्या स्वातंत्र वीरांनी या देशासाठी 1947 पूर्वी खूप हाल-अपेष्टा व वेळप्रसंगी बलिदान दिला आहे अशा स्वातंत्र्यवीरांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

हेही वाचा: जमावबंदी असताना मोर्चे काढणाऱ्यांवर होणार कारवाई; गृहमंत्र्यांचा इशारा

कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांनी स्वातंत्र्य आणि गुलामगिरी यातील फरक काय असतं त्याची जर खरी परिस्थिती समजून घ्यायचे असेल तर अफगाणिस्थान मधल्या एखाद्या व्यक्तीला विचारून बघाव किंवा त्याच अवलोकन करावं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला भारत स्वातंत्र्याच्या सत्तरीतले आपल्या अस्तित्वाची खऱ्या अर्थाने जाणीव होईल, राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात मात्र एखाद्याची चमचेगिरी करण्यासाठी स्वातंत्र्यला भिकेची उपमा देणे कितपत योग्य आहे. स्वातंत्र्याचा अभिमान बाळगून अशा प्रकारचे भाष्य करणे कलावंतांनी टाळणेच गरजेचे आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

loading image
go to top