esakal | विलासराव यांनी ज्ञानगंगा रुजवली : चौगुले
sakal

बोलून बातमी शोधा

चौगुले

विलासराव यांनी ज्ञानगंगा रुजवली : चौगुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओतूर : ‘‘शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे सरांनी ‘महिलांसाठी शिक्षण- सर्वांसाठी शिक्षण’ हे ब्रीदवाक्य घेऊन जाणता राजा शरद पवारसाहेबांच्या प्रेरणेतून तालुक्यात ज्ञानगंगा रुजवली. त्यातून तालुक्याच्या विकासात व वैभवात हातभार लावला आहे,’’ असे मत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील जनमंगल पतसंस्थेचे संस्थापक अनंतराव चौगुले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: शिवणेतील दांगट पाटील नगर येथे अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा.

डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे यांच्या ७४व्या जयंतीनिमित्त श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूर व शिक्षणमहर्षी स्व. विलास तांबे फाउंडेशन पुणे यांच्या वतीने ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भरत अवचट, चैतन्य पतसंस्थेचे अध्यक्ष भास्कर डुंबरे यांना; तर गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष स्व. गुलाबअण्णा डुंबरे यांचा मरणोत्तर पुरस्कार त्यांचा मुलगा नितीन यांना चौगुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पुण्याचे नगरसेवक विशाल तांबे, मानद सचिव वैभव तांबे, विश्वस्त नीलमताई तांबे, ओतूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, ‘विघ्नहर’चे संचालक धनंजय डुंबरे, भानुविलास गाढवे, विक्रम अवचट, सुदाम ढमाले, सचिन तांबे, मयूर ढमाले, बाळासाहेब डुंबरे, वसंतराव तांबे, वैभव डुंबरे, महेंद्र पानसरे, प्राचार्य डॉ. गणेश दामा आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे : कंपनीचे तीन कोटी ६८ लाख स्वतःच्या खात्यात वळविले

चौगुले म्हणाले, ‘‘विलासराव तांबे सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे गोरगरिबांसाठी अविरत काम केले. ज्ञान, कर्तृत्व व धाडस यांचा मिलाप ते होते. त्यांच्या या खडतर जीवन प्रवासात त्यांना पत्नी नीलमताई यांची भक्कम साथ लाभली. त्यामुळे त्यांनी एवढे मोठे शैक्षणिक संकुल उभारले. विशाल व वैभव हे समर्थपणे या शैक्षणिक संकुलाची जबाबदारी पार पाडत असून, पुढील काळात त्यांनी पुढाकार घेऊन समृद्ध जुन्नर तालुक्यासाठी प्रयत्न करावे. त्यात शेतमाल प्रकिया उद्योग, आयटी पार्क, शेतीसाठी आधुनिक मशिनरी याबाबत काम करावे.’’

पी. बी. घनवट यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्रीहरी तांबे यांनी आभार मानले.

loading image
go to top