‘प्री वेडिंग’ फोटोशूटसाठी गावाकडं चला!

सुदाम बिडकर
Thursday, 26 November 2020

कोरोनोमुळे संपूर्ण जग बदलून गेले आहे. विवाह सोहळ्याच्या पद्धती बदलल्या आहेत. कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होत असल्याने खर्चात मोठी बचत होत आहे. त्यामुळे वधुवरांची ‘प्री वेडिंग’ फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगला पसंती वाढली आहे. शहरी भागातील वधुवरांकडून फोटोग्राफी व शूटिंगसाठी ग्रामीण भागातील शेती आणि पुरातन महाल व वाडे यांच्या लोकेशनला जास्त पसंती दिली जात आहे.

पारगाव - कोरोनोमुळे संपूर्ण जग बदलून गेले आहे. विवाह सोहळ्याच्या पद्धती बदलल्या आहेत. कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होत असल्याने खर्चात मोठी बचत होत आहे. त्यामुळे वधुवरांची ‘प्री वेडिंग’ फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगला पसंती वाढली आहे. शहरी भागातील वधुवरांकडून फोटोग्राफी व शूटिंगसाठी ग्रामीण भागातील शेती आणि पुरातन महाल व वाडे यांच्या लोकेशनला जास्त पसंती दिली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘प्री वेडिंग’ फोटोशूटसाठी महाबळेश्वर, गोवा, माथेरान, पाचगणी आदी हिल स्टेशनची निवड केली जायची. यासाठी स्थानिक महागड्या हॉटेल व रिसोर्टचे बुकिंग केले जायचे. परंतु, कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाउनने उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. मागील महिनाभरापासून व्यवहार सुरळीत होऊ लागले असले, तरी मंदीचे सावट कायम आहे. नागरिक पर्यटनस्थळे असणाऱ्या हॉटेल व रिसॉर्टमध्ये जायला अजून धजावत नाही. त्यामुळे प्री वेडिंगसाठी वधुवरांकडून ग्रामीण भागात निसर्गाच्या सान्निध्यात व गर्दीपासून दूर असलेल्या रिसॉर्टची निवड केली जाते.

'अशा निवडणुका जिंकता येत नाहीत'; फडणवीसांचा अजित पवारांना टोला

तसेच, पुरातन महाल व वाड्यांनाही पसंती दिली जाते. काहींना ग्रामीण भागातील शेतातील पिकांमध्ये फोटोग्राफी करायला आवडते. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या काळातही खासगी मालकी असलेल्या महाल व राजवाडे मालकांना आणि ग्रामीण भागातील रिसोर्टला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. काही राजवाडे व महालांची मालकी खासगी व्यक्तींकडे आहे. त्या ठिकाणी काही प्रमाणात शुल्क आकारले जाते. परंतु, त्यामुळे तेथे स्वच्छता राखली जाते. सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाते. त्यामुळे अशा वास्तूंचे जतन होईल, असे छायाचित्रकार शरद पोखरकर व चेतन लोखंडे यांनी सांगितले.

'कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही दबणारे नाही'; फडणवीसांचे महाविकास आघाडीला आव्हान

या ठिकाणांना पसंती
भोर शहरातील राजवाडा, जुन्नरजवळील हबशी महाल, खेड तालुक्‍यातील वाफगावमधील होळकरवाडा आदी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या पुरातन ठिकाणांना वधुवरांकडून फोटोग्राफीसाठी खास 
पसंती असते. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: village for pre wedding photoshoot