Pune News : कलमोडी धरणाचे पाणी आंबेगाव वखेड तालुक्यातील गावांना मिळणार - दिलीप वळसे पाटील

198 कोटी 49 लाख रुपये रकमेला राज्य शासनाचीप्रशासकीय मान्यता: सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
Villages in Ambegaon Wakhed Taluka will get water from Kalmodi Dam Dilip Valse Patil
Villages in Ambegaon Wakhed Taluka will get water from Kalmodi Dam Dilip Valse Patil

मंचर : कलमोडी (ता.खेड)धरणातून सद्यस्थितीत प्रचलित दरसुची वापरुन तयार केलेल्या १९८कोटी ४९ लाख रुपये किंमतीच्या प्रथम सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.” असे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.

त्यामुळे आंबेगाव व खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. वळसे पाटील म्हणाले “कलमोडी धरणातील पाणी आंबेगाव तालुक्यातील पेठ, कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव, कोल्हारवाडी, पारगाव तर्फे खेड व खेड तालुक्यातील वाफगाव, वरुडे, जऊळके व अन्य गावांतील शेतीसाठी मिळावे या मागणीसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुरु होता.

राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कलमोडी धरणाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याची लांबी २९५ मीटर व उंची ३६.८० मीटर आहे. धरण पाण्याने भरलेले आहे. या धरणातील पाणी वेळ नदीवरील नऊ कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यात सोडण्याचे नियोजन आहे.

Villages in Ambegaon Wakhed Taluka will get water from Kalmodi Dam Dilip Valse Patil
Pune News : आंबेठाणचा 'तो' खड्डा ठरतोय ट्रॅफिकसाठी ब्लॅक स्पॉट,एका खड्ड्याने MIDC वेठीस, प्रशासनाकडून दुर्लक्ष

कलमोडी प्रकल्पांतर्गत उपसा सिंचनाद्वारे प्रकल्पांतर्गत होणाऱ्या पाणी वापरासाठी सातगाव पठार या उपसा सिंचन योजनेची आखणी दोन टप्प्यात करण्यात आलेली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील उपसानंतर बंदिस्त नलिका वितरण व्यवस्था करुन खेड तालुक्यातील एक हजार ६२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

तर दुसऱ्या टप्प्याअंती पाणी वेळ नदीत सोडून त्यावरील बंधाऱ्यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील तीन ४४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. असे एकूण ५०६५ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.”

“कलमोडी प्रकल्पाचा सन १९९६-९७ च्या दरसुचीवर आधारीत ५४ कोटी तीस लाख रुपये किंमतीच्या मूळ प्रशासकीय अहवालास मान्यता प्राप्त आहे. सद्यस्थितीत प्रचलित दरसुची वापरुन तयार केलेला १९८ कोटी ४९ लाख रुपये किंमतीच्या प्रथम सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.”

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com