

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : विमल इलायचीच्या जाहिरातीद्वारे प्रतिबंधित पानमसाला उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहिरात होत असल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ११ ऑगस्ट २०२६ला ही नोटीस जारी करण्यात आली असून, १५ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास किंवा मुदतीत उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात १३ जुलै २०२६च्या आदेशानुसार पानमसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत विमल या ब्रँडशी पानमसाला उत्पादनाची बाजारातील असलेली ओळख लक्षात घेता विमल इलायचीच्या जाहिरातीमुळे प्रतिबंधित उत्पादनाच्या ब्रँडची अप्रत्यक्ष जाहिरात किंवा ब्रँडची ओळख मजबूत होण्याची शक्यता असल्याचे एफडीएने नोटिशीत नमूद केले आहे.
कागदोपत्री पुराव्याचे निर्देश
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६मधील कलम २४अंतर्गत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध आहेत. तसेच कलम ५३अंतर्गत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी दहा लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. जाहिरातीत सहभागी असलेल्या व्यक्तीची जाहिरात प्रसिद्धीतील पक्षकार म्हणून जबाबदारी ठरते का, याबाबतही तपास केला जाणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. विमल इलायची हे स्वतंत्र उत्पादन आहे की पानमसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनाच्या ब्रँडचा विस्तार म्हणून त्याचा वापर केला जात आहे, याबाबतही कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.