महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या कार्यक्रमाकडे तावडेंची पाठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

या कार्यक्रमाची उद्घाटनाची वेळ सकाळी 11 ची होती. महाराष्ट्रभरातून सकाळी 9 वाजता आलेले शाहीर टिळक, खासदार अनिल शिरोळे अद्यापही न आल्याने कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

पुणे : महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाकडे राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी पाठ फिरविली. 

सुमारे दोन महिन्यांपूर्वी पूर्वनियोजन झालेल्या कार्यक्रमाला वेळ देऊनही तावडे कार्यक्रमाला उपस्थित नाहीत. सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहराच्या महापौर मुक्ता टिळक अजून कार्यक्रमस्थळी हजर नाहीत. टिळक यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावित्रीबाई फुले सभागृहात कार्यक्रम असूनही त्या अद्याप आल्या नाहीत.

या कार्यक्रमाची उद्घाटनाची वेळ सकाळी 11 ची होती. महाराष्ट्रभरातून सकाळी 9 वाजता आलेले शाहीर टिळक, खासदार अनिल शिरोळे अद्यापही न आल्याने कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Vinod Tawde not attended Shahir cultural programme in Pune