पुणे : उद्यानात येणाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली

सुषमा पाटील
Friday, 27 November 2020

पालिकेच्या नियमांची या उद्यानात पायमल्ली होत असून   कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

रामवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून बंद असलेले महापालिकेचे उद्याने खुली करण्यात आलेली आहे. 
दहा वर्षाखालील लहान मुलांना व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बागेत प्रवेश दिला जाणार नसल्याचे महापालिका आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे, मात्र वडगावशेरी येथील राजे छत्रपती शिवाजी उद्यानात विनामास्क येणाऱ्यांना तसेच जेष्ठांना ही उद्यानात प्रवेश दिला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पालिकेच्या नियमांची या उद्यानात पायमल्ली होत असून   कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही
पालिकेच्या आदेशात सोशल डिस्टंन्स तसेच मास्क वापरणे बंधनकारक आहे असे नमूद करण्यात आलेले असताना उद्यानात येणारे व्यायाम प्रेमी कोरोनाचा वाढत्या  संसर्गाकडे कानाडोळा करीत  वॉकिंग ट्रॅकवर विना मास्क  चालताना दिसत होते. तर काहीजण उद्यानाच्या आभासी बेंचवर तसेच झाडाच्या गोल कट्टयावर गप्पा  मारताना दिसत होते.

जवळपास आठ महिन्यापासून बंद असलेले उद्यान खुली करण्यात आल्याने चेहऱ्यावर आंनद व समाधानाबरोबर उद्यानात वाढलेले झाडेझुडपे, गाजरगवत, उंच उंच वाढलेल्या वेली, गळून पडलेल्या झाडांच्या पानांचा खच पडलेला आहे. मनाला प्रसन्न, नवचैतन्य देणारे तसेच नेहमी स्वच्छ व हिरवेगार असणारे उद्यान उदास व बकाल दिसत असल्याने त्याची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांसह नेहा गायकवाड यांनी केली आहे.

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी  

महानगरपालिकेच्या अटी शर्थीवर पुण्यातील उद्यान सुरु करण्यात आले आहे. नागरिकांनी  प्रशासनाने घालून दिलेले नियमांचे पालन केले पाहिजे. उद्यानात सोशल डिस्टंन्स राखणे व मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्यानात येणारे नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास आरोग्याच्या  सुरक्षितेच्या दृष्टीने उद्यान बंद केले जाईल-अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: violation of rules by visitors to the park in pune