रेशनकार्डविना मिळणार स्वस्त धान्य; व्हॉट्सअॅपवर व्हायरल मेसेज खोटा

Viral message on WhatsApp is false about Cheap grains are available without ration card
Viral message on WhatsApp is false about Cheap grains are available without ration card

पुणे : ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही त्यांनी फक्त एक अर्ज भरून दिल्यास त्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळणार असल्याची बातमी आणि यासाठी अर्ज व्हॉटसअपवर व्हायरल होत होत आहे. याबाबताची खातरजमा केली असता हे वृत्त आणि त्यासाठी अर्ज हा खोटा असून चुकीची माहिती व्हॉटसअपवर व्हायरल होत असून अशा प्रकारची शासनाची कोणतीही योजना नसल्याचे जिल्हाप्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सद्यस्थितीत फक्त अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेतील रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य देण्यात येत आहे, अशी माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सध्या करोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्याने काही नागरिकांना उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. मला धान्याची गरज असून माझ्याकडे शिधापत्रिका नाही. तरी मला धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केलेला अर्ज व्हॉटसऍपद्वारे सर्वत्र व्हायरल झाला आहे. तसेच ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही. त्यांना महाराष्ट्र शासन धान्य देणार आहे. असा उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. असा मेसेज कोणीतरी खोडसाळेपणा व्हॉटसऍपवर व्हायरल टाकल्याने काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. तर काही नागरिकांनी आमच्याकडे रेशनकार्ड नाही. आम्हाला सुध्दा धान्य मिळणार का, अशी विचारणा दुकानांमध्ये करत होते. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांची डोकेदुखी वाढली. त्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले.

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू
दरम्यान याविषयी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी मोरे यांनी सांगितले की, व्हॉटसऍपवर व्हायरल होत असलेला तो अर्ज आणि वृत्त खोटे आहे. कोणीतरी अशी चुकीची माहिती खोडसाळपणे पाठविली आहे. नागरिकांनी यावर विश्‍वास ठेवू नये.

जगभरातील मृतांची संख्या वाढली; युरोपमध्ये सर्वाधिक 21 हजार मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com