Coronavirus : 'लॉकडाऊन'बाबतचा 'तो' व्हिडिओ पुण्यातील नाही : डॉ. शिसवे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

पुण्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थापने बंद असणार आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सोशल डिस्टन्स पाळावा. तसेच घरातच राहावे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला असताना सोमवारी (ता.३०) "३१ मार्चपासून तीन दिवस शहरे १०० टक्के बंद राहणार," असा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र, हा व्हिडिओ पुण्यातील नाही, नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. असे असताना सोमवारी सोशल मीडियावर "मंगळवारी ३१ मार्च पासून शहरे पुढील तीन दिवस १०० टक्के बंद राहणार," असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये दूध वगळता पालेभाज्या, किराणा मालाची दुकाने बंद असणार आहेत, तर दवाखाने सुरु राहणार असल्याचे सांगितले जात होते.

- Lockdown : एप्रिलफूलच्या भानगडीत पडू नका, अन्यथा...!

याविषयी डॉ. शिसवे म्हणाले, "संबंधित व्हिडीओ पुण्यातील नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. पुण्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थापने बंद असणार आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सोशल डिस्टन्स पाळावा. तसेच घरातच राहावे."

- 'ईसीएस' मेसेजमुळे कर्जधारकामध्ये संभ्रम; रिझर्व बँकेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष्य!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral video about lockdown in Pune was fake said Deputy Commissioner Dr Ravindra Shiswe